01 March 2021

News Flash

तपोवन बोगद्यातून आणखी दोन मृतदेहांचा शोध

आतापर्यंत चिखलाने भरलेल्या बोगद्यातून ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्यांचा सलग दहाव्या दिवशी शोध घेण्यात येत असून मंगळवारी सकाळी तपोवन बोगद्यातून आणखी दोन मृतदेह मिळाले. त्यामुळे मृतांची संख्या ५८ वर पोहोचली असून अद्यापही १४६ जण बेपत्ता आहेत.

आतापर्यंत चिखलाने भरलेल्या बोगद्यातून ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मंगळवारी दोन मृतदेह मिळाले त्यापैकी एक मृतदेह मध्यरात्री तर दुसरा मृतदेह रात्री २ वाजता बोगद्यातून मिळाला. चामोली जिल्ह्य़ात अनेक यंत्रणा मदतकार्यात गुंतलेल्या असून तपोवन बोगद्यात जवळपास ३० कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

‘एनटीपीसी’कडून मदत

तपोवन प्रकल्पामध्ये ज्या कामगारांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईचे वाटप सुरू करण्यात आले असल्याचे एनटीपीसीकडून मंगळवारी सांगण्यात आले. विमला देवी यांना २० लाख रुपयांचा पहिला धनादेश १५ फेब्रुवारी रोजी देण्यात आला, तपोवन प्रकल्पाचे प्रमुख आर. पी. अहिरवार यांच्या नेतृत्वाखालील पथक विमला देवी यांच्या घरी गेले आणि त्यांना धनादेश दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:14 am

Web Title: two more bodies found in tapovan tunnel abn 97
Next Stories
1 ‘ओटीटी’ मंचांवर कारवाईचा विचार
2 किरण बेदींना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरुन हटवले; मुख्यमंत्र्यासोबतचा वाद भोवला?
3 करोना : चिंता वाढवणारी बातमी! सर्वाधिक Active Cases मध्ये महाराष्ट्र आघाडीवर; केंद्राने दिला ‘हा’ सल्ला
Just Now!
X