News Flash

केरळ : नौदलाच्या ग्लायडरला अपघात, दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

नियमित प्रशिक्षणादरम्यान घडला अपघात

कोची : नौदलाच्या एका ग्लायडरला अपघात झाला असून यात दोन नौदल अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

केरळच्या कोची जिल्ह्यात रविवारी सकाळी थोप्पुम्पदी पूलाजवळ एका ग्लायडरला अपघात झाला. या अपघातात दोन नौदल अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. नौदलाने निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

नौदलाने सांगितलं की, नियमित प्रशिक्षणादरम्यान आयएनएस गरुडवरुन आकाशात झेप घेतलेल्या ग्लायडरला रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या ग्लायडरमध्ये असलेल्या दोन्ही नौदल अधिकाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

लेफ्टनंट राजीव झा (वय ३९, उत्तराखंड) आणि पेटी ऑफिसर सुनीर कुमार (वय २९, बिहार) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांना आयएनएचएस संजीवनीमधील डॉक्टरांनी मृत घोषीत केले. नौदलाच्या दक्षिण कमांडने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 11:31 am

Web Title: two naval officers killed in glider crash in kochi aau 85
Next Stories
1 हाथरस प्रकरणी प्रियंका गांधींचे मोदी सरकारला पाच प्रश्न
2 २४ तासांत ७५,८२९ करोनाबाधित, ९४० रुग्णांचा मृत्यू
3 सुप्रीम कोर्टाच्या निरिक्षणाखाली चौकशी व्हावी; हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी
Just Now!
X