News Flash

नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय जवानांकडून दोन पाकिस्तानी सैनिक ठार

सीमा रेषेवरील गोळीबारास दिले चोख प्रत्युत्तर

संग्रहीत

भारतीय जवानांना एलओसी समोरील नौशेरा सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात यश आले. मंगळवारी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमारेषेवर गोळीबार केला होता. यास भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एक उपनिरीक्षक शहीद झाले होते.

बीएसएफ रायझिंग डे साजरा करीत असतानाच उपनिरीक्षक शहीद होण्याची घटना घडली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राजौरी क्षेत्रात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक पी. ग्युइट हे शहीद झाले. ग्युइट यांनी सहकाऱ्यांचे प्राणही वाचविले. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचे चार जवान, बीएसएफ अधिकाऱ्यासह ११ जण शहीद झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 10:43 am

Web Title: two pakistan army soldiers killed along loc opposite naushera sector by indian army msr 87
Next Stories
1 देशभरात २४ तासांत ३३ हजार ८१३ जण करोनामुक्त, २६ हजार ३८२ नवे करोनाबाधित
2 भाजपा खासदार सनी देओल यांना आता ‘Y’ दर्जाची सुरक्षा
3 रजनीकांत – कमल हासन हातमिळवणी करणार?
Just Now!
X