News Flash

अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या गोळीबारात २ ठार १७ जखमी

संशयित विद्यार्थ्याला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली.

अमेरिकेतील केंटुकी परिसरातील एका शाळेतील १५ वर्षीय विद्यार्थ्याने अचानक केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी ठार तर अनेकजण जखमी झाले. REUTERS/Harrison McClary

अमेरिकेतील केंटुकी परिसरातील एका शाळेतील १५ वर्षीय विद्यार्थ्याने अचानक केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी ठार तर अनेकजण जखमी झाले. हे सर्व विद्यार्थी एका हॉलमध्ये जमा झाले होते. त्याचवेळी अचानक या विद्यार्थ्याने गोळीबार सुरू केला. याप्रकरणी त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी त्याची ओळख सार्वजनिक केलेली नाही. त्याच्याविरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यातून बचावलेल्या एका विद्यार्थीनीने घटनेची माहिती दिली. ती म्हणाली, तो काय करत होता, याचं त्याला भान होतं. तो एकामागोमाग एक गोळ्या झाडत होता. संशयित विद्यार्थ्याला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली. त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची पोलीस माहिती घेत आहेत. मार्शल काऊंटी हायस्कूलमध्ये झालेल्या या गोळीबारात १७ जण जखमी झाले आहेत. यातील १२ जणांना गोळी लागली आहे तर पाच जण इतर कारणामुळे जखमी झाल्याचे केंटुकी स्टेट पोलीसचे लेफ्टनंट मायकल वेब यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 6:02 pm

Web Title: two people killed and 17 wounded in firing at us school and suspect arrested
Next Stories
1 छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; ४ पोलीस शहीद, ७ जखमी
2 ‘आप’ला दिलासा नाही! अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3 पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेला जवान जगदीश नाईक शहीद
Just Now!
X