दक्षिण कोरियातील इशिऑन आंतरराष्ट्रीय विमानतळावर धुक्यामुळे १०० वाहनांच्या अपघातात दोन ठार तर ६८ जण जखमी झाले आहेत.
 या अपघातातील सातजणांची प्रकृती गंभीर आहे असे इशियॉनचे अग्निशमन व सुरक्षा अधिकारी बेयॉन टाऊ यांनी सांगितले.
अपघातात एकूण १८ परदेशी नागरिक जखमी झाले असून त्यात सात चिनी, तीन थायलंडचे तर फिलिपिन्स व व्हिएतनामचा प्रत्येकी एक जण आहे.
पोलीस अधिकारी पार्क सँग सोल यांनी सांगितले की, नुकसान झालेल्या मोटारी ४४०० मीटरच्या सागरी पुलावरून काढण्यात आल्या आहेत. अंदाजे १०० वाहनांचा हा अपघात होता. सोल येथे धुक्यामुळे ही वाहने आदळली व एकमेकांवर पडत गेली. त्यावेळी १० मीटर अंतरावरचेही काही दिसत नव्हते. धुक्यामुळे १८ विमान उड्डाणे लांबणीवर टाकण्यात आली. सात विमानांचे आगमन होऊ शकले नाही ते लांबणीवर टाकले गेले.