जम्मू काश्मीरमध्ये पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. श्रीनगरमधील नौगाव सेक्टरमध्ये हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर एक कर्मचारी जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत हल्ला झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. “नौगाव बायपासजवळ दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण यावेळी दोघे शहीद झाले. परिसर सील करण्यात आला आहे”.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.