स्पॅनिशच्या तुरुंगातील दोघा जणांना आयसिसचा प्रचार केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसिसचा प्रचार करण्यांबरोबरच आयसिसकडून फाशी देण्यात आलेली काही ध्वनिचित्रफित प्रसारित केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. शनिवारी या दोघा संशयितांना अटक केल्याची माहिती स्पेनच्या अंतर्गत मंत्रालयांकडून देण्यात आली.
पोलिसांनी सन सॅबस्टियनच्या किनाऱ्यालगतच्या मारटूटेने तुरुंगातून सुटलेल्या २४ वर्षीय मोरक्कन नागरिकाला बासक्यूच्या उत्तरेकडील झुमारगा गावातून अटक केली, तर ३२ वर्षीय स्पनिश नागरिकाला तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. अटक केलेले दोनही संशयित जेलमधील साधारण गुन्ह्य़ांशी निगडित कामामुळे जोडले गेले होते, अशी माहिती अंतर्गत मंत्रालयाने पत्रकारांना दिली.