News Flash

पाकिस्तानमध्ये २ दहशतवाद्यांना अटक

पेशावरमध्ये टाकण्यात आलेल्या दहशतवादविरोधी छाप्यात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

पेशावरमध्ये टाकण्यात आलेल्या दहशतवादविरोधी छाप्यात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सुरक्षा दलावर हल्ला करणाऱ्या या दोन दहशतवाद्यांना पकडण्यासाठी प्रत्येकी एक दशलक्ष रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. सुरक्षा दलांवर हल्ला करण्याबरोबरच अन्य दहशतवादी कारवायांना जबाबदार असलेल्या या दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत होता, असे जिल्हा पोलीस अधिकारी खलिद मेहमूद हमदानी यांनी सांगितले. या दहशतवाद्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 2:51 am

Web Title: two terrerist arrested in pakistan
टॅग : Pakistan
Next Stories
1 भूसंपादन विधेयकाबाबत केंद्राची तडजोड करण्याची तयारी
2 खालीद, भट्टाचार्य यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
3 रशियाची सीरियातून माघार; शांतता बोलणीस पूरक स्थिती
Just Now!
X