News Flash

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार, २००० च्या नवीन नोटा सापडल्या

भारतीय जवानांनी दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

संग्रहित छायाचित्र.

जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा येथे आज चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. परिसरात आणखी दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. जवानांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. दुसरीकडे बीएसएफच्या जवानांनी आरएसपुरा सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला टिपले आहे.

आरएसपुरामध्ये पाकिस्तानी घुसखोरांबाबतची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी त्यांना इशारा दिला. पण घुसखोरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जवानांनी गोळीबार केला. त्यात एक पाकिस्तानी घुसखोर ठार झाला. दुसरीकडे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर काश्मीरमधील बांदीपुरामध्ये मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले.या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान सध्या चकमक संपली आहे. मात्र, जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. लष्कराला मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात आणखी दोन दहशतवादी दडून बसले आहेत. त्यामुळे जवानांनी शोधमोहीम आणखी तीव्र केली आहे. दरम्यान, जवानांनी दहशतवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

दहशतवाद्यांकडे नवीन २००० च्या नोटाही सापडल्या

बांदीपुरा येथे चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, त्यांच्याकडे २००० रुपयाच्या नवीन नोटाही सापडल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 12:59 pm

Web Title: two terrorist and one pakistani intruder killed in jammu kashmir in armys operation
Next Stories
1 पंतप्रधान टीव्ही आणि कॉन्सर्टमध्ये बोलतात, मग संसदेत का बोलत नाहीत?- राहुल गांधी
2 संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी पुन्हा भावूक
3 अजान सुरू होताच सोनिया गांधींनी भाषण थांबवले
Just Now!
X