News Flash

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे जप्त

संग्रहित छायाचित्र

जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आले. कुपवाडा जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या झूनारेशी गावामध्ये आणि दक्षिण काश्मीरमधील शोपिअन भागात या चकमक झाल्या.
या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने जवान पाठवून शोधमोहिम राबविण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरमधून काही दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्यात सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याची माहिती मिळाली होती. तेच दहशतवादी आज झालेल्या चकमकीत ठार झाल्याची माहिती मिळते आहे. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
शोपिअन भागामध्ये सोमवारी रात्रीपासून लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्या चकमक सुरू होती. त्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती लष्कराने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2016 5:35 pm

Web Title: two terrorist killed in an encounter in jammu kashmir
टॅग : Terrorism,Terrorist
Next Stories
1 Scorpio समवेत ७ गाड्या ‘क्रॅश टेस्ट’मध्ये नापास
2 आमच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसू नका; भारताने पाकला खडसावले
3 या यशस्वी व्यक्तींना त्यांच्या आवडत्या महाविद्यालयात मिळाला होता नकार!
Just Now!
X