03 March 2021

News Flash

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक, २४ तासांत चार दहशतवादी ठार

चकमकीत एक जवान जखमी झाला आहे

संग्रहित छायाचित्र

जम्मू काश्मीरमधील शोपियनमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेली ही दिवसभरातील तिसरी चकमक आहे. सुरक्षा जवानांनी परिसर सील करुन सर्च ऑपरेशन सुरु केलं असता ही चकमक उडाली होती. दरम्यान फायरिंग सध्या थांबली असून सर्च सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे.

दरम्यान आज पहाटे जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दलीपोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं होतं. मात्र, चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान देखील शहीद झाला. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दलीपोरा येथे काही दहशतवादी असल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त पथकाला मिळाली होती. त्यानंतर आज पहाटे जवानांनी या परिसराला घेरलं आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाचा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आणि चकमकीला सुरूवात झाली. दरम्यान, पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 6:25 pm

Web Title: two terrorist killed in jammu kashmir during gunfight
Next Stories
1 पिवळया साडीतील त्या महिलेची ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याची इच्छा
2 सायबर हल्ल्याच्या धर्तीवर अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी
3 मुस्लीम व्यक्तीने संचारबंदी मोडून गर्भवती हिंदू महिलेला पोहोचवले रुग्णालयात
Just Now!
X