जुलैमध्ये पर्यटकांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनांच्या दोन संशयित दहशतवद्यांना पोलिसांनी चकमकीत ठार केले. पुलवामा जिल्ह्य़ात ही घटना घडली. या कारवाईत तीन सुरक्षा कर्मचारी, दोन लष्कराचे अधिकारी आणि सात नागरिक जखमी झाले आहेत. काही दहशतवादी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस, राष्ट्रीय रायफल आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांनी तपासणी मोहीम सुरू केली. या वेळी दोन दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले.