23 January 2021

News Flash

कुलगामध्ये जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

परिसरात अद्यापही शोधीमोहीम सुरू

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिंगम परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. यानंतर जवानांनी एम-4 रायफल आणि एक पिस्तुल हस्तगत केले. जवानांकडून या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

चिंगम परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर परिसरात वेढा देऊन शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. चकमक झाल्यानंतर देखील परिसरात जवानांकडून शोधीमोहीम राबवली जात आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील सुगन झैनापोरा भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती. या चकमकीत देखील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं.

काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं असून, दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. तर तीन जवान जखमी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 9:37 am

Web Title: two terrorists killed chingam area of kulgam district msr 87
Next Stories
1 भारत-चीन सीमावाद : अमेरिका म्हणतं,”भारताला सहकाऱ्याच्या रूपात…”
2 तिकीट रद्द करण्यासंबंधी रेल्वेचा मोठा निर्णय; रेल्वे सुटण्यापूर्वी…
3 मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन
Just Now!
X