जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा रक्षक आणि काही दहशतवादी समोरा समोर आल्यानंतर त्यांच्यात जोरदार चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. काल (बुधवार) रात्री उशीरा ही चकमक सुरु झाली होती.

Updates :

दुपारी एकच्या दरम्यान आलेल्या ताज्या माहितीनुसार, या दोन्ही मृत दहशतवाद्यांची ओळख पटली असून ते लष्कर-ए-तोयबाचे सदस्य होते. ओवीस बट्ट आणि ताहीर अहमद अशी यांची नावे आहेत. यानंतर लष्कराकडून ही शोध मोहीम थांबवण्यात आली.

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात बाराटकलन-गुंड मोहल्ला येथे काल (बुधवारी) काही दहशतवादी लपून बसले होते. सुरक्षा रक्षकांना याची खबर मिळाल्यानंतर त्यांनी परिसरात शोध मोहिम सुरु केली. दरम्यान, हे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात जोरदार चकमक झाली. दरम्यान, यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत गुरुवारी पहाटेपर्यंत ही चकमक सुरु होती. सध्या चकमक थाबंली असून शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.