News Flash

शोपियां पाठोपाठ पुलवामामध्येही दोन दहशतवाद्यांचा खात्मा

दोन दिवसांत चार दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हाकरीपोरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. या ठिकाणी अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या भागात दोन ते तीन दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यामुळे दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, आणखी दहशतवादी आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी जवानांकडून शोधमोहीम राबवली जात आहे.

काश्मीर घाटी परिसरात दोन दिवसांमध्ये जवान व दहशतवाद्यांमध्ये घडलेली ही तिसरी चकमक आहे. ज्यामध्ये एकूण चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या अगोदर शोपियांमध्ये देखील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

आणखी वाचा- दहशतवादी संघटनांसह काश्मीर हादरवण्याचा ISI चा प्लॅन

पुलवामाच्या हाकरीपोरा भागात दोन ते तीन दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार लष्काराची 50 आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त पथकाने परिसरास वेढा दिला व शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. चकमक सुरू झाल्याच्या तासाभरातच या दहशताद्यांचा जवानांकडून खात्मा करण्यात आला.

आणखी वाचा- जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

दरम्यान, या अगोदर दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील मेलहुरा भागात जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. शिवाय, या दहशतवाद्यांकडील एके-47 रायफल व एक पिस्तुल देखील जप्त करण्यात आले होते. काल सायंकाळापासून सुरू असलेली चकमक आज थांबल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा काल सायंकाळीच खात्मा करण्यात आला होता. तर दुसऱ्या एका दहशतवाद्यास आज ठार करण्यात आलं.

बीएएसएफने नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला – 

दरम्यान, ओदिशामधील मलकानगिरी येथे बीएसएफकडून नक्षलवाद्यांचा घातपातचा डाव उधळण्यात आला आहे. येथील स्वाभिमान अंचलमध्ये नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्याच्या दृष्टीने जमिनीत पेरून ठेवलेले सात स्फोटकं जवानांनी उद्धवस्त केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 4:39 pm

Web Title: two terrorists were killed in an encounter with police and security forces in pulwama msr 87
Next Stories
1 …आता मोदींच्या नेतृत्वात देशभरात केवळ एकच नारा – योगी आदित्यनाथ
2 राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस
3 “माफी मागणार नाही”, राहुल गांधींनी खडसावल्यानंतरही कमलनाथ निर्णयावर ठाम
Just Now!
X