News Flash

गोव्यात सनबर्न फेस्टिवलदरम्यान दोन पर्यटकांचा मृत्यू

मादक द्रव्यांच्या अतिसेवनाने किंवा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

संग्रहित छायाचित्र

गोव्यात वागातोर बीच येथे आयोजित सनबर्न फेस्टिवलदरम्यान शुक्रवारी दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मादक द्रव्यांच्या अतिसेवनाने किंवा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हैदराबाद येथील साईप्रसाद आणि वेंकट नामक दोन तरुणांचा या फेस्टिवलदरम्यान घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. यंदा गोव्यातील वागातोर बीच येथे सनबर्न फेस्टिवलचे (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय या फेस्टिवलचा शुक्रवारचा पहिला दिवस होता. यावेळी हे दोघे फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी फेस्टिवलस्थळी दाखल झाले. दार उघडण्याची वाट पाहताना तिकीट बॉक्सवर उभे असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते चक्कर येऊन खाली पडले.

यानंतर त्यांना तातडीने मापुसा येथील अझिलो या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अचानक आलेल्या मृत्यूमुळे या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या दोघांचाही मृत्यू मादक द्रव्यांच्या अतिसेवनाने किंवा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला असू शकतो असा अंदाज गोवा पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या मृत्यूमागीत खरं कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 2:44 pm

Web Title: two tourists die during the sunburn festival in goa aau 85
Next Stories
1 प्रामाणिकपणाची किंमत चुकवावी लागते – निवडणूक आयुक्त अशोक लवासा
2 क्रूरतेचा कळस, पत्नीच्या डोक्यात गोळी घालून गच्चीवरुन खाली फेकलं
3 देशाला बेरोजगारीच्या नोंदवहीची गरज, नागरिक नोंदीची नाही – योगेंद्र यादव
Just Now!
X