News Flash

जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; शोधमोहीम सुरू

चाकुरा परिसरात चकमक जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यांतील चकुरा परिसरात आज जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरूवात झाली. दरम्यान, आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. शिवाय या परिसरात अद्यापही शोधमोही सुरू आहे.

जम्मू-काश्मीर खोऱ्यात काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसत असताना, या अगोदर पाच दिवसांत जवानांनी राबवलेल्या चार मोहिमांमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती. तर, एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण देखील केले होते. शिवाय, दोन दिवसांपूर्वी जवानांकडून लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला याचा देखील खात्मा केला गेला आहे.

पाकिस्तानमधील असलेल्या लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा तीन दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. तर, आत्मसमर्पण केलेला दहशतवादी डोडा येथील रहिवासी असून, त्याची चौकशी सुरू आहे. अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली होती.

आणखी वाचा- जम्मू-काश्मीर: सणांच्या काळात हिंदुबहुल भागात पाकिस्तानचा घातपाताचा कट – गुप्तचर यंत्रणा

याशिवाय या वर्षात आतापर्यंत ७५ यशस्वी मोहिमा राबवल्या गेल्या, ज्यामध्ये १८० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. स्वतंत्रपणे, १३८ दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. यावर्षी जवानांनी राबवलेल्या यशस्वी मोहिमांनी एक विक्रम प्रस्थापित केला असल्याची देखील माहिती डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 2:47 pm

Web Title: two unidentified terrorists killed in shopian encounter msr 87
Next Stories
1 तनिष्कच्या ‘त्या’ जाहिरातीला पाठिंबा दिल्याने चेतन भगतवर भडकले नेटकरी
2 ‘तनिष्क’च्या शोरूमवर कोणताही हल्ला झालेला नाही, पोलिसांनी केलं स्पष्ट
3 पँगाँग तलावात भारताने पाण्याखालून चाल करु नये, म्हणून चीन….
Just Now!
X