News Flash

मद्रास आयआयटीत दोन महिलांची आत्महत्या

सध्या पोलिसांकडून या दोघींच्या मृत्यूचा कसून तपास सुरू आहे.

IIT Madras campus : मद्रास आयआयटीकडून निवदेन जारी करून संशोधक महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. तिच्या कुटुंबियांनाही याबद्दल कळविण्यात आले आहे.

मद्रास येथील आयआयटी संस्थेच्या कॅम्पसमध्ये गुरूवारी दोन महिलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापैकी एक महिला संस्थेत पीएचडीनंतरच्या संशोधन अभ्यासासाठीची विद्यार्थीनी होती तर दुसरी महिला ही आयआयटीत शिकविणाऱ्या प्राध्यापकाची पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने कॅम्पस परिसरात खळबळ उडाली आहे. या दोघींच्या आत्महत्येचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशोधक असणाऱ्या महिलेचा मृतदेह तिच्या हॉस्टेलमधील खोलीत गळफास लावल्याच्या अवस्थेत मिळाला.  मात्र, दुसऱ्या महिलेच्या मृत्यूविषयी अद्यापपर्यंत नेमकी माहिती मिळालेली नाही. सध्या पोलिसांकडून या दोघींच्या मृत्यूचा कसून  तपास सुरू आहे. दरम्यान, मद्रास आयआयटीकडून  निवदेन जारी करून संशोधक महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. तिच्या कुटुंबियांनाही याबद्दल कळविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 10:24 am

Web Title: two women commit suicide inside iit madras campus
Next Stories
1 ब्रिटनच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे
2 अरुणाचलात पुन्हा काँग्रेस
3 अरुणाचलमधील राजकीय तिढा : राष्ट्रपती राजवट ते न्यायालयाचा निकाल
Just Now!
X