02 March 2021

News Flash

धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन बलात्कार

अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दिल्लीमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी नशेखोर असून त्याने बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीला जुन्या दिल्लीतील रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर सोडून दिले. रविवारी सकाळी २४ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.

उत्तर दिल्लीमध्ये पीडित मुलगी तिच्या आईसोबत फुटपाथवर झोपलेली असताना आरोपीने तिचे अपहरण केले. शनिवारी रात्री अडीजच्या सुमारास मुलगी आपल्या बाजूला नसल्याचे आईच्या लक्षात आल्यानंतर तिने शोधाशोध सुरु केली. सकाळी दहाच्या सुमारास आईने पोलीस स्टेशन गाठले व अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांना रेल्वे ट्रॅकजवळ ही मुलगी सापडली.

सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी मंदिर आणि गुरुद्वाराजवळ सापळा रचला होता. आरोपी कचरा गोळा करण्याचे आणि लग्नामध्ये वेटरचे काम करतो. आरोपी पूर्णपणे अमलीपदार्थांच्या आहारी गेला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली व या सर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 5:49 am

Web Title: two year old girl kidnapped raped
Next Stories
1 राष्ट्रवाद कोणाचा तिरस्कार करायला लावत असेल तर धोकादायक – जावेद अख्तर
2 गोरक्षकांनी म्हशी वाहून नेणाऱ्या ट्रकच्या क्लीनरला भोसकलं
3 चीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना अमेरिकेचा इशारा, OBOR म्हणजे फक्त ‘वन वे रोड’
Just Now!
X