गोव्याच्या पणजीमध्ये मित्रांसोबत लाँग ड्राईव्हसाठी निघालेल्या एका महिलेवर त्याच मित्रांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 12 जून रोजी ही घटना घडली असून महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात आयपीसी 376 ड, 325 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरिक्षक सुदेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षांच्या एका महिलेने गुरूवारी (दि.13) गौतम रायकर (वय-25)आणि सर्वेश कौथनकर(वय-24) यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. तक्रारीनुसार, ‘दोन्ही आरोपी दक्षिण गोव्यातील कुरकोरम जिल्ह्यातील रहिवासी असून दोघांनी लाँड ड्राईव्हसाठी तिला बोलावलं, त्यावर ती दोघांसोबत बुधवारी रात्री लाँग ड्राईव्हला निघाली होती. पण पणजीजवळ आल्यानंतर एका किनारपट्टीजवळ कार थांबवून त्या दोघांनी कारमध्येच बलात्कार केला. त्यानंतर किनारपट्टीजवळच कडेला फेकून निघून गेले’.

रस्त्यावर फेकल्याने पीडित महिलेला अनेक जखमा झाल्या असून सध्या त्यांच्यावर पणजीतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तर आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.