चाकूचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱया दोघा नरधमांना उत्तर प्रदेश पोलीसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण असे अटक करण्यात आलेल्या एका तरुणाचे नाव आहे.
संजय कॉलनी परिसरात राहणारी पीडित तरुणी एका वर्कशॉपमध्ये काम करते. रविवारी ती कामावर निघाली असताना तेथून मोटारसायकलवरून चाललेल्या अरूण आणि त्याच्या मित्राने चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. ते तिला अरूणच्या खोलीवर घेऊन गेले. तिथे सुरुवातीला अरूणने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याचा मित्र तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतानाच संबंधित तरुणीने तिथून पळ काढला. मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीसांकडे तक्रार दाखल केली. सोमवारी सकाळी पोलीसांनी दोन्ही तरुणांना अटक केली.