उच्च तंत्रज्ञानाचा वापर असलेली उडती मोटरसायकल २०१७ पर्यंत विक्रीस येईल, असे एका अमेरिकी कंपनीने जाहीर केले. ही मोटारसायकल दोन व्यक्तींना घेऊन ताशी ७२ कि.मी. वेगाने १० फूट उंच उडू शकेल. कॅलिफोर्निया येथील कंपनीने एरो एक्स हॉवर बाईकची घोषणा केली असून तिची किंमत ८५,००० डॉलर इतकी असेल. कंपनीने परतीच्या बोलीवर पाच हजार डॉलर अनामत संकेतस्थळावर स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. एरो-एक्स मोटारसायकल दोनजणांना घेऊन ३ मीटर उंच म्हणजे १० फूट उंचीवरून उडू शकेल, तिचा वेग ताशी ७२ कि.मी. असेल असे गिझमॅगने म्हटले आहे. एरोफेक्स कंपनीची ही मोटरसायकल असून तिच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत तिला चाकांच्या जागी कार्बन फायबर रोटर्स बसवले जाणार असून ही मोटरसायकल जागच्या जागी हवेत जाईल व तिला धावपट्टीची गरज नाही, उतरतानाही ती सरळ खाली उतरेल. ही हॉवरबाईक प्रवासास सोपी असून त्याचे चालक हॅडलबार वापरू शकतील ते गुडघ्याच्या उंचीवर असतील. चालकांना ही मोटरसायकल चालवण्यास आठवडाभराचे प्रशिक्षण घ्यावे लागेल, इंधनाविना तिचे वजन ३५६ किलो राहील व ती १४० किलो वजन वाहून नेऊ शकेल. एकदा इंधन टाकी पूर्ण भरल्यावर ती हॉवरबाईक ७५ मिनिटे चालू शकेल.