News Flash

भेट दोन महासत्ताधीशांची…

चर्चेत बायडेन यांनी रशियातील विरोधी पक्षाचे नेते अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांचा उल्लेख करत तेथील मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित केला.

भेट दोन महासत्ताधीशांची…

जिनिव्हा : अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची बहुप्रतीक्षित परिषद बुधवारी जिनिव्हामध्ये पार पडली. आपापल्या देशाच्या राजदूतांना त्या-त्या ठिकाणी पूर्वस्थितीत आणणे, सायबरसुरक्षा, अण्वस्त्र मर्यादेबाबतच्या करारात फेरबदलासाठी वाटाघाटी करण्यावर उभय नेत्यांमध्ये मतैक्य झाले.

या चर्चेत बायडेन यांनी रशियातील विरोधी पक्षाचे नेते अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांचा उल्लेख करत तेथील मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, पुतिन यांनी नवाल्नी यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले. नवाल्नी यांना देण्यात येत असलेल्या वर्तणुकीबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नांना मात्र त्यांनी बगल दिली. बायडेन यांनी ‘दोन महासत्तांची शिखर परिषद’ असे या भेटीचे वर्णन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 1:05 am

Web Title: u s president joe biden russian president vladimir putin council geneva ambassadors of the country akp 94
Next Stories
1 ‘कोव्हॅक्सिन’च्या निर्मितीवरून राजकीय वाद
2 ‘कोविशिल्ड’च्या दोन मात्रांमधील अंतराबाबत चर्चा सुरू
3 नियम न पाळल्याने भारतातील ट्विटरच्या अडचणीत वाढ
Just Now!
X