वायव्य दिल्लीतील इंद्रलोक भागात एका २७ वर्षीय महिलेवर टॅक्सी चालकाने  बलात्कार केला. उबेर या अंतरराष्ट्रीय कॅब सर्विसची टॅक्सी या महिलेने भाड्याने घेतली होती. घरी परतण्यासाठी मागविलेल्या टॅक्सी चालकानेच या महिलेवर बलात्कार केल्याने राजधानीत एक खळबळ उडाली आहे.
गुडगाव येथील एका कंपनीत काम करत असलेल्या या महिलेने शनिवारी रात्री हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर घरी जाण्यासाठी मोबाईल ऍपवरून उबेरकडून टॅक्सी मागविली. टॅक्सी चालकाने एका निर्जन स्थळी टॅक्सी थांबविली आणि १६ डिसेंबरच्या दिल्लीतील सामूहिक बलात्कारासारखी अवस्था करण्याची भीती दाखवून त्या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत घरी सोडले. अखेर या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, उबेर या कंपनीचा कॅब चालक, शिवकुमार यादव याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून. पोलीस अधिक तपास करत आहेत.