News Flash

Video : स्वयंचलित ट्रकद्वारे पहिल्यांदा मालवाहतूक!

ट्रक रस्त्यावरून धावण्यासाठी कॅमेरा, रडार आणि सेंसरचा वापर करतो.

टॅक्सीची सेवा पुरविणाऱ्या उबेर कंपनीच्या एका उपकंपनीने चालकविरहीत ट्रकची निर्मिती केली आहे. ट्रकची केवळ निर्मिती करण्यात आली नसून, या स्वयंचलित ट्रकने काम करण्यासदेखील सुरुवात केली आहे. या ट्रकने मंगळवारी पहिली मालवाहतूक केल्याची माहिती ट्रकची निर्मिती करणाऱ्या Otto कंपनीने दिली. ट्रकमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग तंत्राचा वापर करण्यात आला आहे. या ट्रकमधून अमेरिकेतील कोलोराडो येथे बिअरची डिलिव्हरी करण्यात आली. स्वयंचलित ट्रकने सुरक्षितपणे ही डिलिव्हरी पार पाडली. १८ चाकं असलेल्या या ट्रकने वर्दळीच्या रस्त्यावरून मार्ग काढत १९३ किलोमीटर अंतर दोन तासांत पार केले.

या प्रवासादरम्यान एक तंत्रज्ञ ट्रकमध्ये उपस्थित होता. तो चालकाच्या सीटवर न बसता मागील बर्थवर बसून केवळ ट्रकच्या हालचालींवर नजर ठेऊन होता. कॅमेरा, रडार आणि सेंसरचा वापर करत रस्त्यावरून धावणारा ट्रक या माध्यमातूनच त्याच्या पुढील आणि मागील गाड्यांमधील आंतराविषयी माहिती मिळवत होता. दोन तासांचा प्रवास करणारा हा ट्रक हायवेवर चालकाविना धावला, तर अतिशय वर्दळीच्या आणि गुंतागुंतीच्या ठिकाणी ट्रकमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीने ट्रक चालवला.

सध्या स्वयंचलित कार आणि ट्रकच्या क्षेत्रात फार मोठ्याप्रमाणावर विकास होताना दिसत आहे. गूगल, टेस्ला मोटर्स, जीएम आणि फोर्डसारख्या कंपन्या या क्षेत्रात सातत्याने काम करत आहेत. ऑन डिमांड कार सेवा पुरविणारी उबेर कंपनीदेखील यात मागे राहिलेली नाही. उबेरने ऑगस्ट महिन्यात स्वीडनमधील कार निर्मिती करणारी कंपनी वोल्वोसोबत ३० कोटी डॉलर्सचा करार केला. याअंतर्गत २०२१ पर्यंत पूर्णपणे चारकविरहीत कारची निर्मिती करण्यात येईल. याव्यतिरिक्त सॅनफ्रॅन्सिस्कोमधील ओट्टो या स्टार्टअप कंपनीचे अधिग्रहणदेखील उबेरने केले आहे. ओट्टोनेचा या स्वयंचलीत ट्रकची निर्मिती केली आहे.

व्हिडिओ :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 1:50 pm

Web Title: ubers self driving truck makes first delivery
Next Stories
1 जेएनयूच्या वसतीगृहात आढळला मणिपूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह
2 खाण घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांची निर्दोष मुक्तता
3 अॅम्ब्युलन्सला ६ तास उशीर झाल्यामुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या प्राध्यापकाचा मृत्यू
Just Now!
X