News Flash

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील अपयशी मुख्यमंत्री, फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं”

बिहार भाजपाचे प्रवक्ते निखील आनंद यांची टीका

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपयशी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं असा सल्ला बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी दिला आहे. एवढंच नाही तर शिवसेनेने आता नाव बदलून बाबर सेना असं नाव ठेवावं असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्यं ही एका लोकप्रिय जननेत्याची वक्तव्यं आहेत. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून काहीतरी शिकलं पाहिजे असंही निखिल आनंद यांनी म्हटलं आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर जी कारवाई काल मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आली त्यानंतर भाजपाने थेट कंगनाची बाजू घेत शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख घटिया असा केला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे हे सर्वात अपयशी मुख्यमंत्री आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. खासकरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्या आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. त्यानंतर ९ सप्टेंबरला आपण मुंबईत येणारच असं आव्हान कंगनाने दिलं होतं. त्यानुसार ती मुंबईत आली होती, याच दरम्यान तिचं मुंबईतील कार्यालय मुंबई महापालिकेने पाडलं. ्त्यावरुन पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेना यांच्यात वाद रंगला. आता बिहार भाजपाचे प्रवक्ते यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरेंवरच टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील अपयशी मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या खोचक टीकेला आता शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 5:04 pm

Web Title: uddhav thackeray is a failed chief minister in the history of maharashtra says bihar bjp leader nikhil anand scj 81
Next Stories
1 ‘डॉगफाइटसाठी थोडं थांबा’; राफेलच्या समावेशावर धोनी म्हणतो…
2 मोराला खाऊ घालण्यातून मोकळे झाले की,…; ‘चीन प्रश्नावरून ओवेसींची मोदींवर टीका
3 कोविड-१९ आजाराला हलक्यात घेऊ नका; पंतप्रधानांचं जनतेला आवाहन
Just Now!
X