04 June 2020

News Flash

विश्व साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

अंदमान निकोबारचे लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आदी उपस्थित राहणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती सुवर्ण महोत्सवाच्या वर्षांत अंदमानमध्ये होत असलेल्या विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनापूर्वी ग्रंथ दिंडीही काढण्यात येणार असून, पुढील दोन दिवस साहित्याचा हा विश्वमेळा रंगणार आहे.
ऑफबीट डेस्टिनेशन व महाराष्ट्र मंडळ यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाला स्वागताध्यक्ष व खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, खासदार संजय राऊत, अंदमान निकोबारचे लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनापूर्वी सेल्युलर जेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान सनई चौघडा, रांगोळीच्या पायघडय़ा टाकून ग्रंथिदडी काढली जाणार आहे. अंदमानातील मराठीजन व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले साहित्यप्रेमी मराठमोळ्या पोशाखात ग्रंथिदडीत सहभागी होणार आहेत.
उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर सावरकरांच्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकावर आधारित कार्यक्रम, निकोबारच्या आदिवासी मुलींचे नृत्य, सेल्युलर जेलच्या क्युरेटर डॉ. रशीदा इक्बाल, अर्चना हर्षे यांचे व्याख्यान तसेच ‘मला उमगलेले सावरकर व अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवाद हे कार्यक्रम शनिवारी होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2015 12:01 am

Web Title: uddhav thackeray to inaugurate akhil bharatiya marathi sahitya sammelan
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 ट्विटरच्या ‘सीईओ’पदाच्या शर्यतीत भारतीय महिला
2 ‘इसिस’मध्ये सामील होण्यास निघालेल्या ११ भारतीयांना अटक
3 आघाडीमध्ये निवडणूक लढवूनही भाजपला बिहारमध्ये स्वबळाची आस, १६० जागांवर ठाम
Just Now!
X