News Flash

शहर स्मार्ट करण्यापेक्षा पाण्याचे प्रश्न सोडवा – उद्धव ठाकरे

राज्यातील जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करुन दाखवू

स्मार्ट सिटी बनवण्यापेक्षा लोकांचे पाण्याचे प्रश्न सोडवा असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये झालेल्या सभेत भाजपला लगावला.
उद्योगपतींच कर्ज माफ होतं मग, शेतक-याचं कर्ज का माफ होत नाही ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमध्ये झालेल्या सभेत विचारला. महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी पैसे नाहीत, ही शरमेची बाब आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. प्रवासासाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थीनीने आत्महत्या करणे हे दुर्देवी बाब आहे. स्वाती पिटलेच्या आत्महत्येनंतर तातडीने परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना फोन करुन यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आणि चार लाख ६० हजार विद्यार्थ्यांचा प्रवास शुल्क शिवसेनेच्या पुढाकाराने माफ करण्यात आल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी दिवाकर रावतेंच्या निर्णयाचं कौतुक केलं. तसेच, शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना गुलाबराव पाटलांच्या पाठिशी असल्याचेही त्यांनी मह्टले. कितीही याचिका झाल्या तरी घाबरु नका, असं सांगत उद्धव यांनी एकनाथ खडसेंवर हल्ला चढवला.
शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणं, हे शिवसेनेचे ध्येय आहे. राज्यातील जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करुन दाखवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार अस्थिर होऊ नये म्हणून स्वाभिमान बाजू ठेऊन सत्तेत सामील झालो असल्याचं उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 6:09 pm

Web Title: uddhav thackeray visited in jalgaon
टॅग : Uddhav Thackeray
Next Stories
1 बनावट कंपन्यांना डीडीसीएने दिले पैसे- किर्ती आझाद
2 स्पेनची मिरिया लालागूना रोयो बनली ‘मिस वर्ल्ड’
3 सेहवाग, गंभीरचा अरुण जेटलींना पाठिंबा
Just Now!
X