भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगलाच चर्चेत आहे. टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात असलेल्या कोहलीने सिडनीतून भारतीय चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देत असताना विराट कोहलीने फटाके न फोडण्याचं आवाहन केलं. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली.
पाहा काय म्हणाला होता विराट – फटाके फोडू नका ! विराटने थेट ऑस्ट्रेलियावरुन दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा
काही नेटकऱ्यांनी आपली पातळी सोडत याप्रकरणी विराटची पत्नी अनुष्का शर्मावरही अश्लील टीका करण्यास सुरुवात केली. रविवारी काही नेटकऱ्यांनी ट्विटरवर #अनुष्का_तेरा_कुत्ता_संभाल असा हॅशटॅगही ट्रेंड केला. विराट आणि अनुष्कावर चहुबाजूंनी टीकेचा भडीमार होत असताना भाजपाचे माजी खासदार आणि काँग्रेसचे सध्याचे प्रवक्ते डॉ. उदीत राज यांनी विराटची बाजू घेतली आहे.
मात्र विराटची बाजू घेत असताना उदीत राज यांनीही त्याची तुलना थेट अनुष्काचा कुत्रा म्हणून केली आहे….
अनुष्का को अपने कुत्ते विराट कोहली को सम्भालने की ज़रूरत नही है। कुत्ता से ज़्यादा वफ़ादार कोई नही। कोहली ने तुम लुच्चे ,लफ़ंगों और मूर्खों को सीख दी थी कि प्रदूषण से मानवता ख़तरे में हैं।
तुम लोगों का डीएनए चेक कराना पड़ेगा कि तुम यहाँ के मूल निवासी हो कि नहीं?— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) November 15, 2020
विराट कोहली के सुझाव का स्वागत लेकिन कुछ दुष्टों ने ट्वीटर पर भद्दी गालियाँ देना शुरू कर दी।हैरान हूँ कि सरकार ये सब देख रही जैसे कि मौन सहमति हो। इनके ख़िलाफ़ कार्यवाही अभी तक नही हुई।ये इंसान नही हो सकते।कुत्ते को भी बुरा कह रहे हैं ।कुत्ता से ज़्यादा वफ़ादार कोई नही।
— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) November 15, 2020
आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाली आहे. २७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून दोन्ही संघ या मालिकेत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहेत. पहिला कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहली अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परत येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 8:33 am