X

पंतप्रधान मोदींच्या घरावर UFO च्या घिरट्या ?

दिल्लीच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण यासंबंधीची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर उडती तबकडी (युएफओ) घिरट्या घालताना दिसल्याचं वृत्त आहे. 7 जून रोजी पंतप्रधानांच्या दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील घरावर उडती तबकडी किंवा त्यासारखी काहीतरी वस्तू दिसली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली पण त्यांच्या हाती निराशा आली.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण यासंबंधीची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. सुरक्षेच्या काराणास्तव त्यांनी माहिती देण्यास नकार दिलाय. 7 जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर तातडीने नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यात आली. युएफओचा शोध घेण्यासाठी शोधमोहीमही हाती घेण्यात आली होती.

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाहीये, वर्ष 2017 मध्ये संसदेवर ड्रोन दिसल्याची सुचनाही हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला आणि सुरक्षा रक्षकांना मिळाली होती.