आफ्रिकेतील युगांडामध्ये निवडणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामुळे सुमारे १० हजार भारतीय दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.
युगांडाची राजधानी कंपालामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार फिजा बेसिजे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर झालेल्या िहसाचारात १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तेथील भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांच्या भारतातील नातेवाईकांनी केली. युगांडामधील भारतीयांमध्ये बुहतांश लोक गुजराती आहेत. त्यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त नाही.
विरोधी पक्ष नेते बेसिजे माकेरेरे यांची प्रचारफेरी सुरू होती. विद्यापीठ परिसरात सभा घेऊन ते तिचा समारोप होणार होते. त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो समर्थक असल्याने त्यांना पोलिसांनी वेगळ्या मार्गाने जाण्यास सांगितले. परंतु, बेसिजे यांनी पोलिसांचे ऐकेले नाही. ज्या रस्त्याने जास्त वाहतूक होती त्याच रस्त्याने त्यांनी विद्यापीठाकडे रॅली नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. परिणामी, त्यांचे समर्थक संतापले आणि प्रचार फेरीला िहसक वळण लागले. यात १० जणांचा मृत्यू झाला तर ३० जण गंभीर जखमी आहेत.
कंपालामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तनात करम्यात आली आहेत.

कंपालातील स्फोटात विद्यार्थी ठार, ८ जखमी
कंपाला- युगांडाच्या राजधानीतील उपनगरात गुरुवारी झालेल्या स्फोटात एक शाळकरी मुलगा मरण पावला असून आठ जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपाला येथील एका शाळेच्या मैदानावर हा स्फोट झाला. मुले ज्या वस्तूशी खेळण्यात मग्न होती ती वस्तू स्फोटक आहे याबाबत मुले अज्ञभिज्ञ होती, असे पोलीस प्रवक्ते फ्रेड इनागा यांनी ‘दी असोसिएट प्रेस’ला सांगितले. तसेच तो हातबॉम्ब असावा अशी शक्यतादेखील त्यांनी वर्तविली आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आठही मुलांची प्रकृती गंभीर आहे.