News Flash

ब्रिटनचे प्रिन्स फिलिप यांच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले

या अपघातातून ९७ वर्षीय प्रिन्स फिलिप थोडक्यात बचावले आहेत.

प्रिन्स फिलिप

ब्रिटनचे प्रिन्स फिलिप यांच्या कारला अपघात झाला. या अपघातातून ९७ वर्षीय प्रिन्स फिलिप थोडक्यात बचावले आहेत. गुरूवारी त्यांच्या गाडीला सैंडीग्राम इस्टेट परिसरात अपघात झाला. ते सुखरूप असल्याची माहिती बकिंघम पॅलेसनं दिली आहे.

प्रिन्स फिलिप स्वत: गाडी चालवत असल्याचं समजत आहे. यावेळी प्रिन्स फिलिप यांच्यासोबत दोघेजण कारमध्ये होते अशीही माहिती मिळत आहे. कार अपघातात तिघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत मात्र सर्व सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अपघातानंतर प्रिन्स फिलिपसह अन्य दोघांनाही रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं मात्र या तिघांवर लगेचच उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

गेल्याच वर्षी प्रिन्स फिलिप यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अनेक देशांत ठराविक वयानंतर वाहन चालवण्यास बंदी असते. पण ब्रिटनमध्ये यासाठी काही वयोमर्यादा नाही. मात्र तब्येतीमुळे त्यांना गाडी चालवण्यास मनाई केली होती अशी माहिती काही दिवसांपूर्वी राजघराण्याची सून केटनं दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 11:00 am

Web Title: uk 97 year old prince philip escapes unhurt from car crash
Next Stories
1 भारतीय लष्कर नेहमीच पाकिस्तानपेक्षा एक पाऊल पुढे
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 कांदळवन क्षेत्रातील भरीव वाढीची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद
Just Now!
X