News Flash

प्रत्यार्पणाविरुद्ध मल्याच्या अपिलावर आज सुनावणी

मल्या याने एप्रिलमध्ये केलेला लेखी अर्ज न्यायालयाने नाकारला होता.

भारतात प्रत्यार्पणाविरुद्ध अपील करण्यासाठी मद्यसम्राट विजय मल्या याने केलेल्या अपिलावर ब्रिटनमधील हायकोर्ट उद्या, मंगळवारी सुनावणी करणार आहे. यापूर्वी प्रत्यार्पणाविरुद्ध अपील करण्यासाठी परवानगी मिळवण्याकरता मल्या याने एप्रिलमध्ये केलेला लेखी अर्ज न्यायालयाने नाकारला होता.

विजय मल्या याने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाविरुद्ध अपील करण्यासाठी केलेला अर्ज ब्रिटिश हायकोर्टात मंगळवारी तोंडी सुनावणीसाठी येईल. लंडनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजनचे दोन न्यायाधीशांचे पीठ मल्याने एप्रिलमध्ये केलेल्या अर्जाची सुनावणी करेल. या अर्जाद्वारे त्याने ब्रिटनचे होम सेक्रेटरी साजित जाविद यांनी त्याला भारतात प्रत्यार्पित करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरुद्ध अपील केले आहे. न्यायाधीश याप्रकरणी त्यांचा निर्णय राखून ठेवण्याची आणि येत्या काही आठवडय़ांत निकाल जाहीर करण्याची अपेक्षा आहे.

६२ वर्षांचे आता मृतप्राय झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक असलेला मल्या हा भारतीय बँकांकडून घेतलेल्या ९ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा थकबाकीदार आहे. त्याच्यावर भारतात घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार आणि विदेशी विनियम व्यवस्थापक कायदा (फेमा) यांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत.

जॉर्ज लेगॅट आणि अँड्रय़ू पॉपलवेल यांनी मल्याचे अपील नाकारले, तर त्याला अपिलाच्या निकालापासून २८ दिवसांच्या आत प्रत्यार्पित करावे लागेल. तथापि त्याला अपील करण्याची परवानगी देण्यात आली, तर त्याच्या अपिलाची ब्रिटनच्या हायकोर्टात ‘फुल हिअरिंग’ होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 1:51 am

Web Title: uk high court vijay mallya mpg 94
Next Stories
1 अखंडतेचा भंग केल्यास जशास तसे प्रत्युत्तर : शहा
2 सर्वोच्च न्यायालयात १६ जुलैला सुनावणी
3 ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे मानसिक आरोग्याला फायदा
Just Now!
X