ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये (आरसीएन) काम करणाऱ्या जवळपास ३० हजार भारतीय आणि इतर देशांच्या परिचारिकांना बळजबरीने मायदेशी पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्या स्थलांतर कायद्यातील कठोर तरतुदींचा परिणाम त्यांच्या नोकरीवर होणार असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ नर्सिगच्या अहवालात युरोपबाहेरून आलेल्या परिचारिकांना प्रत्येकी ३५ हजार पाऊंडपेक्षा(वार्षिक) कमी पगार मिळत असल्याचे स्पष्ट केले होते. नव्या कायद्यामध्ये यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या युरोपबाहेरील कर्मचाऱ्यांना मायदेशी पाठविण्याची तरतूद करण्यात येणार आहे. यानुसार सहा वर्षे आरसीएनमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार केला जाणार आहे.