11 August 2020

News Flash

सीरियातील बंडखोर गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

सीरियात परस्परांविरोधात लढणाऱ्या बंडखोर गटांना संयुक्त राष्ट्रांचे मध्यस्थ लखदार ब्राहिमी हे भेट भेटणार असून संबंधित गट समोरासमोर बसून वाटाघाटी करण्यास तयार आहेत का, याचा अदमास

| January 24, 2014 12:03 pm

सीरियात परस्परांविरोधात लढणाऱ्या बंडखोर गटांना संयुक्त राष्ट्रांचे मध्यस्थ लखदार ब्राहिमी हे भेट भेटणार असून संबंधित गट समोरासमोर बसून वाटाघाटी करण्यास तयार आहेत का, याचा अदमास ब्राहिमी घेतील.गुरुवारी झालेल्या शांतता परिषदेच्या पहिल्या उभयपक्षी कटू वादविवाद झाल्यानंतर यासंबंधी निर्णय घेण्यात आला. सीरियाचे अध्यक्ष बशर अल् यांच्या राजवटीतील प्रतिनिधी व विरोधकांसमवेत ब्राहिमी यांची चर्चा होईल. जिनिव्हा येथे यासंबंधी शुक्रवारी चर्चा होणार आहे. सीरियातील लढय़ावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रपुरस्कृत परिषदेस येथे बुधवारी प्रारंभ झाला. मात्र या परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर उभय बाजूंनी असहमती दर्शविण्यात आली. त्यामुळेच ब्राहिमी यांनी आता उभय पक्षांसमवेत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 12:03 pm

Web Title: un tries to bring syrian adversaries together
टॅग Un
Next Stories
1 सीरियातील दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या दोन ब्रिटिश महिलांना अटक
2 महिला आयोगापुढे बाजू मांडणे सोमनाथ भारतींनी टाळले
3 ‘पंतप्रधानपदाचा उमेदवार देणाऱयांवर विरोधकांमध्ये बसण्याची वेळ येणार’
Just Now!
X