News Flash

अल्पवयीन मुलाने विवाहित महिलेवर बलात्कार करुन सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडीओ

पीडित महिलेच्या सासू-सासऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला घराबाहेर काढले.

(संग्रहित छायाचित्र)

एका अल्पवयीन मुलाने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील सादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला. आरोपीने या कृत्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. पीडित महिलेच्या सासू-सासऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला घराबाहेर काढले.

“विवाहित महिलेवर बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलाने त्या कृत्याचा व्हिडीओ बनवला व सोशल मीडियावर अपलोड केला” असे सादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. आयएएनएस वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. बलात्काराची ही घटना पाच महिन्यांपूर्वी घडली. पण महिला त्यावेळी याबद्दल काहीही बोलली नाही.

पण आता व्हायरल व्हिडीओमुळे जेव्हा पीडित महिलेला अपमानित करुन घराबाहेर काढण्यात आले, तेव्हा तिने पोलिसांची मदत मागितली. महिलेने सादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना तिच्यासोबत काय घडलं? ती सर्व माहिती दिली आहे. आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत. आरोपी फरार आहे. त्याला लवकरच अटक करु असे सादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. पीडित महिला आता तिच्या आई-वडिलांसोब राहते. ज्या मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करण्यात आला, तो मोबाइल फोन पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 1:42 pm

Web Title: under age boy rapes woman uploads video on social media dmp 82
Next Stories
1 व्हाइट हाऊसची शर्यत जिंकण्यासाठी बायडेन यांना हवी फक्त सहा मतं, ती ‘या’ राज्यातून मिळू शकतात
2 US Election 2020 : ट्रम्प-बायडेन समर्थक भिडले; अमेरिकेत तीव्र संघर्षाची चिन्हं; यंत्रणा High Alert वर
3 कुणामध्येही इतका दम नाही; ‘सीएए’वरून नितीश कुमारांचं टीकास्त्र
Just Now!
X