अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे. छोटा राजनने पोटदुखीची तक्रार केल्याने रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. याआधी एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाल्यानंतर त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

२०१५ मध्ये इंडोनेशियामधून प्रत्यार्पण केल्यापासून छोटा राजनला दिल्लीमधील तिहार जेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. छोटा राजनविरोधात असणारी सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली होती आणि एक विशेष कोर्ट स्थापन करण्यात आलं होतं. २०१८ मध्ये छोटा राजनला २०११ मध्ये झालेल्या पत्रकार जे डे हत्या प्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती.