News Flash

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्स रुग्णालयात दाखल

गुरुवारी सकाळी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे

Underworld don Chhota Rajan, AIIMS,
गुरुवारी सकाळी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं (File Photo: PTI)

अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे. छोटा राजनने पोटदुखीची तक्रार केल्याने रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. याआधी एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाल्यानंतर त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

२०१५ मध्ये इंडोनेशियामधून प्रत्यार्पण केल्यापासून छोटा राजनला दिल्लीमधील तिहार जेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. छोटा राजनविरोधात असणारी सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली होती आणि एक विशेष कोर्ट स्थापन करण्यात आलं होतं. २०१८ मध्ये छोटा राजनला २०११ मध्ये झालेल्या पत्रकार जे डे हत्या प्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 11:33 am

Web Title: underworld don chhota rajan admitted to aiims sgy 87
Next Stories
1 “तालिबानी लोक हे सामान्य नागरिक; अमेरिकेमुळे परिस्थिती खराब झाली”; इम्रान खान यांचा आरोप
2 बँका बुडवण्याची प्रेरणा कोणाची?; केंद्राच्या निर्णयानंतर संजय राऊतांचा सवाल
3 बलात्कार प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या; तीन पोलीस निलंबित
Just Now!
X