News Flash

पोस्टाच्या तिकिटावर चक्क छोटा राजनचा फोटो; टपाल विभागाचा अनागोंदी कारभार

फोटो सोशल मीडियात व्हायरल

संग्रहित

टपाल तिकीट म्हटलं की त्यावर अनेक महान व्यक्ती, स्मारकं तसंच मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे फोटो त्यावर छापलेले दिसतात. पण कानपूरच्या टपाल विभागाने चक्क अंडरवर्ल्ड डॉन माफियाचा फोटो पोस्टाच्या तिकीटावर छापलं आहे. मुख्य टपाल कार्यालयाकडून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि बागपत जेलमध्ये मारला गेलेला गँगस्टर मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेलं तिकीट प्रसिद्ध करण्यात आलं आहे. टपाल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत हे टपाल काढण्यात आलं आहे.

पाच रुपयांची ही १२ तिकीटं छापण्यात आली आहेत. यामधील १२ फोटोंवर छोटा राजन आणि इतर १२ फोटोंवर मुन्ना बजरंगीचा फोटो आहे. या प्रकरणी सध्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.

काय आहे माय स्टॅम्प योजना –
२०१७ मध्ये केंद्र सरकारकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत कोणतीही व्यक्ती आपला किंवा ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीचा फोटो टपाल तिकीटावर छापून घेऊ शकतो. यासाठी ३०० रुपये भरावे लागतात. हे तिकीट छापून घेण्यासाठी अर्जदाराला पासपोर्ट साइज फोटो तसंच संपूर्ण माहिती द्यावी लागते. एक फॉर्म भरुन द्यावा लागतो, ज्यामध्ये संपूर्ण माहिती घेतली जाते. मृत व्यक्तीचा फोटो टपाल तिकीटावर छापत नाहीत. यासाठी अर्जदाराला कार्यालयात हजर राहावं लागतं. मात्र या प्रकरणी टपाल कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसत आहे.

चौकशीचा आदेश
टपाल विभागाचे पोस्ट मास्टर जनरल वीके वर्मा यांनी सांगितलं आहे की, “नियमाअंतर्गत तिकीट काढू इच्छिणाऱ्या व्यक्तीला कार्यालयात हजर राहावं लागतं. तिथे वेबकॅमच्या आधारे फोटो घेतला जातो. जर कोणत्या गुंड किंवा माफियाच्या नावे तिकीट प्रसिद्द झालं आहे तर चौकशी करुन योग्य कारवाई केली जाईल”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 1:26 pm

Web Title: underworld don chhota rajan and gangster munna bajrangi postal stamps sgy 87
Next Stories
1 भारतातील प्रसिद्ध सेक्स एक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचे निधन
2 “… म्हणून नितीश कुमारांनी इच्छा नसतानाही मुख्यमंत्रीपद स्वीकारलं”
3 …म्हणून राहुल गांधी इटली दौऱ्यावर; खरं कारण आलं समोर
Just Now!
X