News Flash

छोटा राजन जिवंत आहे; ‘त्या’ वृत्तानंतर AIIMS च्या अधिकाऱ्यांचा खुलासा

दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत

फाइल फोटो (AP Photo/Firdia Lisnawati)

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन हा जिवंत असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच एम्समध्ये उपचारादरम्यान राजनवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी राजनचा मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. मात्र काही वेळातच एएनआयने एम्समधील सुत्रांच्या हवाल्याने राजन जिवंत असल्याचं म्हटलं आहे.

तिहारच्या तुरुंगामध्येच राजनला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या करोनाची लागण झाली. त्याच्यावर सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असं आधी तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र लक्षणं दिसल्यानंतर छोटा राजनची करोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला. यासंदर्भातील माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली होती. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान राजनची प्रकृती खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. २६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत.

एप्रिलच्या मध्यात तुरुंग क्रमांक दोनमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये करोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना वेगळं ठेवलं गेलं आहे, असं तुरुंग प्रशासने स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं जानेवारी महिन्यात राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षांती शिक्षा सुनावली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. २०१५ सालच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आलेली. मुंबईतलं राजनविरोधातील हे खंडणीचं तिसरं प्रकरण आहे, ज्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आलेली. यापूर्वी दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये राजनला इंडोनेशियामधील बालीतून भारतात आणण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 4:12 pm

Web Title: underworld don chhota rajan is still alive aiims official scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 India Lockdown Map : पाहा कोणत्या १४ राज्यांमध्ये आहेत कठोर निर्बंध आणि कुठे आहे अंशत: सूट
2 ‘या’ तीन राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद
3 करोना, ऑक्सिजन पुरवठ्यावरून नेटिझन्स संतापले, #मोदीइस्तीफादो झालं ट्विटरवर ट्रेंड!
Just Now!
X