19 October 2020

News Flash

दाऊद इब्राहिमची जमीन १.३८ लाखाला विक्रीस; तुम्हीही घेऊ शकता विकत

दाऊदशी संबंधित संपत्तीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री असणार आहे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भलेही पाकिस्तानमध्ये राहू मोठी संपत्ती गोळा करत असेल पण त्याची भारतातील संपत्ती मात्र आता विक्रीच्या मार्गावर आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित संपत्तीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री असणार आहे. स्क्वेअरफीटने दिलेल्या वृत्तानुसार, स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्सकडून (SAFEMA) या संपत्तीचा लिलाव होणार आहे. १० नोव्हेंबरला ई-लिलाव, टेंडर तसंच सार्वजनिक लिलावाच्या माध्यमातून संपत्तीची विक्री होईल.

लिलाव होणारी संपत्ती – (ही संपत्ती रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील कुंबके गावात आहे)
२७ गुंठे जमीन – राखीव किंमत २.५ लाख
२९.३० गुंठे जमीन – राखीव किंमत २.२३ लाख
२४.९० गुंठे जमीन – राखीव किंमत १.८९ लाख
२० गुंठे जमीन – राखीव किंमत १.५२ लाख
१८ गुंठे जमीन – राखीव किंमत १.३८ लाख
घर क्रमांक १७२ आणि २७ गुंठे जमीन – राखीव किंमत ५.३५ लाख
याशिवाय लोटे गावात ३० गुंठे जमीन आहे ज्याची राखीव किंमत ६१.४८ लाख ठेवण्यात आली आहे

सफेमाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर माहिती दिली आहे की, “आम्हाला याआधीच दाऊदच्या या संपत्तीचा लिलाव करायचा होता, पण करोनामुळे लांबणीवर टाकावं लागलं होतं”. अधिकाऱ्याने आम्हाला यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला असंही सांगितलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लिलाव होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

लिलावात बोली लावणारे २ नोव्हेंबरला संपत्तीची पाहणी करु शकतात. ६ नोव्हेंबरला ४ वाजण्याआधी सफेमाकडे अर्ज पोहोचणं गरजेचं आहे. यासोबत डिपॉझिटही जमा करावं लागणार आहे. १० नोव्हेंबरला ई-लिलाव, टेंडर तसंच सार्वजनिक अशा तिन्ही प्रकारे लिलाव होणार आहे.

याशिवाय दाऊदचा जवळचा माणूस म्हणून ओळखला जाणारा इक्बाल मिर्ची याच्याही मुंबईतील दोन संपत्तीचा लिलाव होणार आहे. सांताक्रूझमधील मिल्टन अपार्टमेंटमध्ये इक्बाल मिर्चीच्या नावे दोन फ्लॅट असून त्यांची विक्री होणार आहे. सोसायटीमध्ये असणाऱ्या रेकॉर्डनुसार दोन्ही फ्लॅटचा एरिया १२४५ स्क्वेअर फूट इतका आहे. या दोन्ही फ्लॅटची राखीव किंमत ३ कोटी ४५ लाख एवढी ठेवण्यात आली आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सफेमाने नागपाडा येथील दाऊदच्या बहिणीच्या नावे असणारा ६०० स्क्वेअर फूट फ्लॅट १ कोटी ८० लाखांना लिलावात विकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:09 pm

Web Title: underworld don dawood ibrahim property in ratnagiri on sale sgy 87
Next Stories
1 Bihar Elections: मतांच्या टक्केवारीत भाजपाची जोरदार मुसंडी; ठरला एकमेव राष्ट्रीय पक्ष
2 “पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बरे”; GDP वरुन राहुल यांचा मोदी सरकारवर निशाणा
3 दिलासादायक! भारतात रुग्णसंख्येमध्ये होतीये घट, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८७.३५ टक्क्यांवर
Just Now!
X