News Flash

बेरोजगारीचं संकट गडद होणार, मोठ्या पॅकेजची गरज-राहुल गांधी

आर्थिक संकटाशी सामना करण्याचीही तयारी सरकारने आत्तापासून करावी

करोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यानंतर आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झगडणाऱ्या आपल्या देशाला याच बेरोजगारीच्या आणखी मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी केंद्राने पॅकेज जाहीर करावं अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. सध्या सरकारने काय केलं नाही काय करायला हवं होतं या सगळ्या चर्चांची वेळ नाही. सध्या एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करायला हवा असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्या आर्थव्यवस्थेवर प्रचंड तणाव येणार आहे. मात्र या संकटाचा सामना करावाच लागणार. सध्याच्या घडीला माणसाचं आयुष्य वाचणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. मात्र त्याचवेळी व्हायरस आपली अर्थव्यवस्था नष्ट करणार नाही याचीही काळजी आत्तापासून सरकारने घ्यायला हवी असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- १० लाख लोकांमागे फक्त १९९ चाचण्या, राहुल गांधींनी सांगितल्या १० महत्वाच्या गोष्टी

लघू उद्योगांना, शेतकऱ्यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच भारत एकजूट करुन उभा राहिला तर या संकटाचा सामना अतिशय आरामात करु शकतो. या व्हायरसला हरवू शकतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आणखी वाचा- आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही – राहुल गांधी

प्रत्येक आठवड्याला मजुरांना, गरीबांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू, १ किलो साखर आणि १ किलो डाळ मोफत द्यावं. आपली धान्याची कोठारं भरली आहेत ती अशा संकटाच्या काळात खुली करावीत असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. तसंच जे आर्थिक संकट आपल्यासमोर येणार आहे त्यासाठी सरकारने आत्तापासून तयारी करायला हवी असंही ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:35 pm

Web Title: unemployment problem will be serious in coming days we have to fight with it says rahul gandhi scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : करोनाला हरवण्यासाठी लॉकडाउन पुरेसं नाही – राहुल गांधी
2 चिंतेत भर, महाराष्ट्राची रुग्णसंख्या तीन हजारांवर
3 “२०२२ पर्यंत पाळावे लागणार सोशल डिस्टन्सिंग; २०२४ पर्यंत करोना संसर्ग सुरु राहण्याची शक्यता”
Just Now!
X