News Flash

अरविंद केजरीवालांची प्रसिद्धीमाध्यमांवर पुन्हा आगपाखड

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पुन्हा एकदा प्रसिद्धीमाध्यमांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले.

| March 15, 2014 01:18 am

अरविंद केजरीवालांची प्रसिद्धीमाध्यमांवर पुन्हा आगपाखड

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पुन्हा एकदा प्रसिद्धीमाध्यमांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले. नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील खरी परिस्थिती प्रकाशझोतात आणण्याचे धाडस प्रसारमाध्यमांकडे आहे का असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी सत्य माहिती प्रसिद्धीमाध्यमांकडून देण्यात येत नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. यापूर्वीसुद्धा केजरीवालांनी आपले सरकार आले तर माध्यमांच्या प्रतिनिधींना कारागृहात टाकू असे विधान केले होते. मात्र, त्यानंतर सारवासारव करत अरविंद केजरीवाल यांनी आपण असे विधान केलेच नसल्याचा दावा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2014 1:18 am

Web Title: unfazed arvind kejriwal fires yet another salvo at media
Next Stories
1 भरपाईची दिल्ली दूरच
2 दिल्ली बलात्कार : चौघा नराधमांची फाशी उच्च न्यायालयाकडून कायम
3 व्हिसा गैरवापरप्रकरणी देवयानी खोब्रागडे दोषमुक्त
Just Now!
X