News Flash

करोनावरील लस खरेदी आणि पुरवठय़ासाठी ‘युनिसेफ’चा पुढाकार

आम्ही लस खरेदी करून सर्व देशांना त्याचा सुरक्षित, वेगाने व समान पुरवठा करू ,असे संस्थेने म्हटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

करोनावर लस उपलब्ध झाली तरी ती कुणाला, कशी व केव्हा उपलब्ध होणार हा सर्वात मोठा प्रश्न असून आता युनिसेफने यात पुढाकार घेऊन लशीची खरेदी व पुरवठा याची जबाबदारी घेतली आहे.

आम्ही लस खरेदी करून सर्व देशांना त्याचा सुरक्षित, वेगाने व समान पुरवठा करू ,असे संस्थेने म्हटले आहे. ‘दी युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड ’म्हणजे ‘युनिसेफ ’ही जगातील सर्वात मोठी लस खरेदी करणारी संस्था असून ते दरवर्षी विविध लशींचे २ अब्ज डोस खरेदी करीत असतात. नेहमीच्या लसीकरणात ज्या लशींचा समावेश असतो त्या १०० देशात वितरित केल्या जातात. ही संस्था आता ‘रिव्हॉल्विंग फंड ऑफ दी पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या मदतीने कोविड १९ लशींची खरेदी करणार आहे.

‘कोव्हॅक्स ग्लोबल व्हॅक्सिन’ सुविधा त्यासाठी उभारण्यात आली असून त्यात कमी व मध्यम उत्पन्न गटातील ९२ देशांना लस दिली जाईल. युनिसेफने शनिवारी एका ट्वीट संदेशात म्हटले आहे, की आम्ही हे मोठे आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत.

गोवर, पोलिओ यासारख्या रोगांवर ही संस्था दरवर्षी २ अब्ज लशीचे डोस खरेदी करून शंभर देशांना देत असते. युनिसेफ ही लस खरेदीत समन्वयाचे काम करते. ८० टक्केउच्च उत्पन्न देशांना लस खरेदीत मदत करण्यात युनिसेफची मदत असते. आता कोविड लशीसाठी कोवॅक्स ही सुविधा करण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत जगातील १७० देशात या लशीचा समान पुरवठा करणे हे आव्हानात्मक काम संस्थेने घेतले आहे.

संस्थेच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर यांनी सांगितले, की सरकारांशी उत्पादन, विविध भागीदार याबाबत समन्वय राखावा लागेल. सर्व देशांना सुरक्षित, वेगाने व समान पातळीवर लस मिळेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना’, ‘गॅव्ही व्हॅक्सीन अलायन्स’, ‘कोअ‍ॅलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेर्डनेस इनोव्हेशन्स’, ‘पाहो’, ‘जागतिक बँक’, ‘बिल व मेलिंडा गेटस फाउंडेशन’ या संस्था त्यात भागीदार असतील. कोव्हॅक्स सुविधा सर्व देशांना खुली राहील. एकही देश लशीपासून वंचित राहू नये यासाठी हा प्रयत्न आहे.

२८ उत्पादकांनी लस उत्पादनाच्या त्यांच्या योजना युनिसेफला दिल्या आहेत. येत्या १-२ वर्षांत मोठय़ा प्रमाणावर कोविड १९ लशीची निर्मिती करावी लागणार आहे. गॅव्ही व्हॅक्सीन या संस्थेने गेल्या वीस वर्षांत ७६ कोटी मुलांना लस दिली असून १.३ कोटी मुलांचे प्राण वाचवले आहेत, असे या संस्थेचे कार्यकारी संचालक सीथ बर्कले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:26 am

Web Title: unicefs initiative to purchase and supply the coronavirus vaccine abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नीरव मोदीच्या प्रत्यार्पण खटल्याची सुनावणी सुरू
2 निर्जंतुकीकरण बोगद्यांवर बंदी का नाही – न्यायालय
3 दक्षिण कोरियाला वादळाचा तडाखा, जपानमध्येही हानी
Just Now!
X