केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. गेल्या वर्षी १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीसटी) लागू करण्यात आल्याने आधीच्या ८८ अर्थसंकल्पांपेक्षा यंदाचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे सर्वसामान्य माणसांचे लक्ष लागून असते. पण, जीसटीमुळे जवळपास यावरूनही पडदा उठला आहे. ज्या वस्तू जीसटीमध्ये मोडत नाहीत त्यांच्याच किंमतींमध्ये सर्वाधिक फरक दिसून येणार आहे. उदा. पेट्रोल आणि डिझेल.

काय महाग
मोबाईलवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून वाढवून २० टक्के करण्यात आल्याने आता मोबाईल खरेदी महागणार आहे.

एलईडी, एलसीडी

तंबाखूजन्य वस्तूंवरील उत्पादन शुल्कात वाढ

फळं आणि भाज्यांचे ज्यूस

परफ्युम, सौंदर्यप्रसाधने आणि टॉयलेटरिज

ट्रक आणि बसचे टायर

सिल्क कपडा

गॉगल

चप्पल आणि बूट

इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड

खेळणी, व्हिडीओ गेम

क्रीडा साहित्य

मेणबत्त्या

खाद्यतेल

मासेमारी जाळं

खाद्यतेल / वनस्पती तेल जसे ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल

काय स्वस्त
१. कच्चा काजूवरील सीमा शुल्क ५ वरुन अडीच टक्के करण्यात आल्याने काजू स्वस्त होतील.
२. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने इंधन २ रुपयांनी स्वस्त
३. आयात कर वाढवल्याने भारतातील वस्तू स्वस्त होतील, मागणी वाढेल