News Flash

Budget 2019: अतीश्रीमंतांवर मोदी सरकारकडून कराचा बडगा

वार्षिक दोन ते पाच कोटी उत्पन्न असणाऱ्यांना तीन टक्के सरचार्ज लागणार आहे, तर पाच कोटी रुपयांपर्यंत जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सात टक्के सरचार्ज लागणार आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं बजेट आज सादर केलं. यावेळी त़्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारकडून अतीश्रीमंतावर कराचा बोजा वाढवण्यात आला आहे. वार्षिक दोन ते पाच कोटी उत्पन्न असणाऱ्यांना तीन टक्के सरचार्ज लागणार आहे, तर पाच कोटी रुपयांपर्यंत जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सात टक्के सरचार्ज लागणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

Budget 2019: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार पुरेसं, पॅनकार्डची गरज नाही
Budget 2019: जे ५५ वर्षात झालं नाही ते आम्ही पाच वर्षात करुन दाखवलं – निर्मला सीतारामन

तसंच एक कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम बँकेतून काढल्यास त्यावर दोन टक्के टीडीएस लागणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.

दुसरीकडे सर्वसामान्यांना मात्र दिलासा देण्यात आला असून पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. तसंच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य नसणार आहे. फक्त आधार कार्ड असलं तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे.

Budget 2019: इलेक्ट्रिक कार घेतल्यास दीड लाखांपर्यंत करसवलत
Budget 2019: लवकरच २० रुपयाचे नाणेही चलनात येणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा

स्वस्त घर खरेदी करणाऱ्यांना खूशखबर असून गृहकर्जाच्या व्याजावर ३.५ लाख रुपयांपर्यंतच्या करावर सूट देण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:42 pm

Web Title: union budget 2019 nirmala sitharaman annual income tax lok sabha sgy 87
Next Stories
1 Budget 2019: लवकरच २० रुपयाचे नाणेही चलनात येणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा
2 लोकसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
3 Budget 2019: इलेक्ट्रिक कार घेतल्यास दीड लाखांपर्यंत करसवलत