05 December 2020

News Flash

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांना करोनाची लागण

गृह अलगीकरणात असल्याची दिली माहिती.

जगभरात आणि देशात करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही दिवसांपासून देशातील काही नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच प्रोटोकॉलनुसार आपण गृह अलगीकरणात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार मी गृह अलगीकरणात आहे. माझ्या सोबत कार्यरत असलेले कर्मचारी आणि मित्रांनी स्वत:कडे लक्ष द्यावं. संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जाईल,” अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.

शुक्रवारी दिल्लीत नव्या १ हजार १९२ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतील करोनाबाधितांची एकूण संख्या आता दीड लाखांवर गेली आहे. तर दिल्लीत करोनामुळे आतापर्यंत ४ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत करोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरूवारी ५६ हजारांपेक्षा अधिक करोनामुक्त

आतापर्यंत देशात ४८ हजार ४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून गुरूवारी एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दैनंदिन करोनामुक्त रुग्णांचीही विक्रमी नोंद झाली असून गुरूवारी ५६ हजार ३८३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १७ लाखांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ६ लाख ६१ हजार ५९५ रुग्ण उपचाराधीन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 9:40 pm

Web Title: union health ministry joint secretary lav agarwal tested coronavirus positive jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 अशांतता निर्माण केल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर मिळणार : राष्ट्रपती
2 संकटकाळात सशस्त्रदलांचं काम अभिमानास्पद : संरक्षणमंत्री
3 लेबनॉनच्या मदतीला धावला भारत; पाठवलं ५८ मेट्रिक टन आपात्कालीन मदत साहित्य
Just Now!
X