News Flash

“…म्हणून वाढतायत पेट्रोल-डिझेलचे भाव”, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं कारण!

देशात अनेक राज्यांमध्ये सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीचं एक नवं कारण सांगितलं आहे.

देशात सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. करोनामुळे हैराण झालेले नागरिक या इंधनदरवाढीमुळे अधिकच संकटात सापडले आहेत. अशातच आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या भाववाढीबद्दलचा खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढलेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने तसंच केंद्रीय आणि राज्यांच्या करांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण दिलं आहे.

आणखी वाचा- महागाईत ‘पेट्रोल’चा भडका! मुंबई-पुण्यात प्रति लिटर १०२+, तर परभणीत १०५ रुपयांवर पोहोचले दर

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात करोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या MSP ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत.

राहुल गांधींनी इंधन दरवाढीवर केलेल्या टीकेबद्दल जेव्हा प्रधान यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, जर राहुल गांधींना गरीबांची एवढीच काळजी वाटते, तर त्यांनी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातल्या इंधनांचे दर कमी करण्यास सांगावे.

गेल्या दीड महिन्यात तेल कंपन्यांनी २५ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. देशात पेट्रोल ६.२६ रुपयांनी तर डिझेल ६.६८ रुपयांनी वाढलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 11:38 am

Web Title: union minister dharmendra pradhan explains cause of rise in petro diesel prices expenditure in coronavirus vaccine ration and other schemes vsk 98
Next Stories
1 भारतातल्या IT क्षेत्रातल्या ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार? – बँक ऑफ अमेरिका
2 कुंभमेळा करोना चाचणी घोटाळा : एक लाख चाचण्यांचं कंत्राट मिळालेल्या कंपनीचं अस्तित्व केवळ कागदपत्रांवर
3 देशात आढळले ६२,२०८ नवीन करोना रुग्ण, २,३३० रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X