News Flash

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान करोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

धर्मेंद्र प्रधान उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल

संग्रहित (PTI)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणामधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

अमित शाह यांना करोनाची लागण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी रविवारी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली.

अमित शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 7:04 pm

Web Title: union minister dharmendra pradhan tests positive for coronavirus sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “तुम्ही लाजू नका, आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये…”; भूमिपूजनाच्या ट्विटवरुन प्रियंका यांना ओवेसींचा टोला
2 “आज राजीव गांधी असते तर…”; भूमिपूजनाच्या निमित्तानं कमलनाथांना झाली आठवण
3 पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती
Just Now!
X