News Flash

“मोदी सरकारची कृषी विधेयकं शेतकरी विरोधी,” केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा

विधेयकं कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवतील असा भाजपाला विश्वास

संग्रहित (PTI)

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकं लोकसभेत मांडली जाणार असून मतदान होण्याच्या आधीच हरसिमरत कौर बादल राजीनामा दिला आहे. हरसिमरत कौर बादल यांच्या शिरोमणी अकाली दल पक्षाने विधेयकांचा विरोध केला असून शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

हरसिमरत कौर बादल यांचे पती आणि पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेत यासंबंधी घोषणा करताना केंद्र सरकार आणि भाजपाला समर्थन असेल पण शेतकरी विरोधी राजकारणाचं समर्थन करणार नाही असं स्पष्ट केलं. भाजपाने विधेयकं कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र या विधेयकांमुळे गेल्या अनेक आठवड्यांपासून आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.

विधेयकांवरील चर्चदरम्यान सुखबीर सिंह बादल यांनी प्रस्तावित कायद्यांमुळे पंजाब सरकारने कृषी क्षेत्र उभं करण्यासाठी केलेली ५० वर्षांची मेहनत वाया जाईल अशी टीका केली. यावेळी त्यांनी पंजाबने भारताला धान्य निर्मितीत स्वावलंबी होण्यामध्ये निभावलेल्या भूमिकेचा उल्लेख केला. यावेली त्यांनी हरसिमरत कौर बादल सरकारमधून राजीनामा देतील अशी घोषणा केली. मोदी सरकारमध्ये शिरोमणी अकाली दलचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हरसिमरत कौर बादल एकमेक सदस्य आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 8:39 pm

Web Title: union minister harsimrat kaur badal will quit modi govt to protest farm bills sgy 87
Next Stories
1 डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा माजी मॉडेल अ‍ॅमी डोरिसचा आरोप
2 ‘ग्रेटर नेपाळ’च्या नावाखाली नैनीताल, देहरादूनवरही नेपाळ सांगतोय हक्क
3 सुशांतची हत्या की आत्महत्या? पुढच्या आठवड्यात कळणार नेमकं कारण
Just Now!
X